अरे धरमा धरमा

संत बहिणाबाईंना वंदन करून,

 

अरे धरमा धरमा, जसा सुरा दुयधारी ।

कधी मनाले फुंकर, कधी बोचतो जिव्हारी ।।

 

अरे धरमा धरमा, रिता खेळ म्हणू नाही ।

मंदिराच्या मुरतीला, धोंडा कधी म्हणू नाही ।।

 

अरे धरमा धरमा, नको दुज्याचं गाऱ्हाणं ।

अरे परक्याच्या देवा, म्हणू नकोरे लोढणं ।।

 

अरे धरमा धरमा, दुज्याचं मोजणे सोडं ।

आधी मनामध्ये कडू, पुन्हा वाटेल रे गोडं ।।

 

असा धरमा धरमा, ज्याले कळाले वागणं ।

वसे  देवाचे पायाशी, फिटे जीवाचं पारणं ।।

 

- गिरीश घाटे