माझे मला कळले
स्वतःच्या अंतर्मनात, वाटलं करावी चोरी
पाहु काय दडलंय, गूढ आपल्याच उरी
शिरलो कुतूहलानं, चोर पावलांनं आत
शोधया लागलो वाट, त्या किच्च काळोखात
दिसेना काहीच पुढे, नसे काही ओळखीचे
सभोवती दिसे रोज, तसे चित्र नेहमीचे
खुलले अखेर डोळे, संपला खेळ मनाचा
उजळून आता दिसे, दरवाजा तिजोरीचा
जे शोधले आजवर, नाही कधी मिळाले
येथेच होते मजकडे, माझे मला कळले
- गिरीश घाटे