फिर्याद

खोटे लाऊन मुखवटे, खुशाल नाचत होते

न कशाला जुमानत्, लफंगे फिरत होते

 

खोट्याचं खरं करणारे, कालचे अट्टल चोर

धुंद आणि नि:संकोच, शासन करत होते

 

तेहत्तीस कोटी देव, तमाशा बघत होते

थोरमोठे लहनांपुढे, हात जोडत होते

 

गर्दीमध्ये चोरांच्या, भरडत होते निर्दोष

लाख करेल फिर्याद, सुनावणी कुठे होते?

 

- गिरीश घाटे