अर्थ नाही काढला

ना माळीली मी परंतू , गंध फुलांचा तू जाणला

गंध केवळ; मी तयाचा, अर्थ नाही काढला

 

नाही वचने ती परंतू, शब्द मी पाळीला

शब्द केवळ; मी तयाचा, अर्थ नाही काढला

 

मनातल्या त्या वेदनांना, स्पर्श सुखवी तुझा

स्पर्श केवळ; मी तयाचा, अर्थ नाही काढला

 

तू, अन कोण तुझा मी, भावनांचा खेळ हा

भावना त्या; मी तयांचा, अर्थ नाही काढला

 

-              गिरीश घाटे