प्राप्तकाळ
उगाच लावे कराया | हिशोब सुख दुःखांचा |
व्यर्थ देतसे वेदना | भूतकाळ हा || १ ||
घडलेच कधी नाही | व्हावे वाटते एकदा |
सदैव लागवे चिंता | भाविकाळ हा || २ ||
सुखवी सभोवतीचे | दृष्य, गंध, स्पर्श हे |
प्रसन्न वाटे मनाला | प्राप्तकाळ हा || ३ ||
झाले गेले भूत जे | नसे माझे, अप्राप्त जे |
जगु एकेक क्षण हा | आज जो माझा || ४ ||
- गिरीश घाटे