कवी विंदा करंदीकरांच्या एक प्रसिद्ध कविता सध्याच्या भाषेत कशी लिहिली जाईल याचा एक गमतीशीर प्रयत्न:

 

विठ्ठल 🙏🏻 

 (मूळ कविता)

 

पंढरपूरच्या वेशीपाशी, आहे एक छोटी शाळा;

सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा

दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल

मास्तर म्हणतात करणार काय?, न जाणो असेल विठ्ठल

-               विंदा करंदीकर

 

नवीन 'जनरेशन' च्या भाषेत,

 

पंढरपूरच्या एन्ट्रीपाशी, आहे एक स्मॉल स्कुल

सर्व बॉईज आहेत फेअर, एक मात्र काळा अन कूल

नॉट्टी  आहे, विट्टी आहे, मीस्चीव करण्यात अट्टल

टीचर म्हणे, व्हॉट टू डू?, हू नोज, असेलही विठ्ठल...

 

विथ ड्यु रिस्पेक्ट

गिरीश घाटे

🙏🏻