आलं शोधत पहा पाखरू

आलं आलं शोधत पहा पाखरू

माझ्या बागेला लागल्यात पेरू

 

निरोप धाडा दाजीला

येणं करा हो आजच्याला

माझ्यानं आता आव्रत नाही

अल्लड पाखरु ऐकत नाही

आता, आता, आता

आता बागेला लागल्यात पेरू

 

आहे तुमची अमानत हो

करते हवाली तुमच्या हो

चोराच्या हाती देऊ नका

भरल्या बागेला सोडू नका

आता, आता, आता,

आता बागेला लागल्यात पेरू

 

- गिरीश घाटे