संत तुकाराम महाराजांच्या “आणूरेणिया थोकडा, तुका आकाशा एव्हडा” या अभंगाचे सार घेऊन केलेले काव्य:

 

मी

मी नसे हे शरीर, माझे मला कळाले |

कर्म कर्ता अन क्रिया, सारे एकचि जाहले || १ ||

 

सूक्ष्म मी चैतन्य मी, चैतन्य ते सर्वभूती |

मी अन भव एक, नसे अनेक वृत्ती || २ ||

 

झाला भ्रम दूर आता, विचार स्वच्छ जाहले |

स्वतःचे नसेच काही, ऋण ते फक्त उरले || ३ ||

 

- गिरीश घाटे