शुभ्रकळी
आज या दवस्पर्शाने, उमलली शुभ्र कळी
बहरला शृंगार कंप, हे ओठ की पाकळी
पश्चिमेचा मंद वारा, डोलली युव कळी
दरवळे मदमस्त गंध, हा पदर की पाकळी
संपला चंद्र पहारा, उजळली धीट कळी
होतसे घायाळ दवं, हे नयन की पाकळी
डाव आज मांडला, पाहटच्या धुंद वेळी
आतुर या मिलनाला, दवं अन शुभ्र कळी
- गिरीश घाटे