उद्योजक
व्यवसाय करे नेटका | मानतो खरी सेवा |
अग्रक्रमी ठेवतो | ग्राहक हा || १ ||
अर्थार्जन योग्य होता | देण्यासी योग्य हिस्सा |
दूजास्थानी मानतो | सहकर्मी हा || २ ||
शेष ठेवतो स्वखर्चा | लाभांश व्यवसायाचा |
तोची योग्य मानावा | उद्योजक हा || ३ ||
जाणला मंत्र जयाने | अचूक या यशाचा |
व्यवसाय स्तुत्य करे | दीर्घकाल हा || ४ ||
- गिरीश घाटे