भावार्थ

भक्ती :

अखेर आज एकदा, तू दिसलास पांडुरंगा

पहाटे गोड स्वप्नात, आज आलास पांडुरंगा

रूप पाहुदे डोळ्यांनी, आज स्वप्नात माझ्या

नको मोडु झोप आता, हेची मागणे पांडुरंगा 

 

सेवा :

नं भेटलो तुला, नं पाहिले पांडुरंगा

कल्पिले श्रीमुख, अन् पूजिले पांडुरंगा

नं झाले दर्शन, मागणे हेची आता

रूप तुझे पाहुदे, माणसांत पांडुरंगा

 

अद्वैत :

शोधिले किती तुला, आसमंतात पांडुरंगा

वाटले भेटशील तू, तव राउळी पांडुरंगा

उमगले दिव्य मजला, कसा शोधू तुला

होता वसलास तू, खुद्द माझ्यात पांडुरंगा

 

- गिरीश घाटे