एकांत

शब्द माझे सूर तुझे,  मेहेफील ही आपली

फुले माझी गंध तुझा,  धुंद सांज आपली

 

डोहात तू लाटेत मी,  शाल विणली आपली

चंद्र अन त्या चांदण्या, माळ सजली आपली

 

द्यावया एकांत आता, किरणे पहा लोपली

 

- गिरीश घाटे