कवी न्यूटन

निश्चल वा गतिमान, राहेन मी अबाधित

क्रमेन मार्ग परंतु, बाह्यबले नसावित || १ ||

 

जडत्वास माझ्या, प्रवेग साथ देई

बल त्यातून माझे, पहा द्विगुणीत होई || २ ||

 

केल्या कृतीस माझ्या, प्रतिसाद जो मिळाला

तितकाच रोध होता, माझा मला कळाला || ३ ||

 

- गिरीश घाटे