जमेल का पुन्हा शिकार करायला

लॉकडाऊन मध्ये घसरलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून बाहेर पडणारा माणूस...

 

वाघानं क्वारंटाईनचा निर्णय घेतला

जंगलचा राजा थेट गुहेमध्ये दडला

एकटाच राजा तो गुहेत काय गेला

लॉकडाऊनने रानात कहरच केला

 

हरिणाला भलता जोर आला

तलावावर पुरता कब्जा केला

म्हणाला आता इ पास काढा

नाहीतर पाण्याचा विचार सोडा

 

माकडानं मारली उलटी गिरकी

सांगे झाडांवर आपुली मालकी

टोल लावला त्यानं खायला पाला

हत्ती जीराफाचा पुरता घोळ केला

 

कोल्हे लांडगे पुरतेच सोकवले

आपलीच मनमानी करू लागले

रात्री दबकत कायम फिरणारे

दिवसाढवळ्या ते फिरू लागले

 

 

जंगलचा राजा विचारात पडला

शिकवू याना धडा ठरवू लागला

जमेल का पुन्हा शिकार करायला

विचारांनी राजाचा थरकाप उडाला

 

-              गिरीश घाटे