डोलायचे राहिले
रोज डोळ्यात माझ्या, उद्याचे स्वप्न पाहिले
सुख आजचे परंतू, भोगायचे राहिले
धुंद वादळी सरींचा, अवेळी पाऊस होता
चिंब पावसात तेंव्हा, भिजायचे राहिले
देण्यास वाट पाण्या, तरणा प्रवाह होता
उनाड झर्यात तेंव्हा, डुंबायचे राहिले
स्वछ निळ्या आकाशी, रम्य इंद्रर्धनू होता
रंगात तयाच्या तेंव्हा, रंगायचे राहिले
वारा तरल फुलांचा, झोका डोलावित होता
डोलणाऱ्या फुलांसवे, डोलायचे राहिले
- गिरीश घाटे