उजळुद्या प्रकाश हा प्रेमाचा

उजळुद्या प्रकाश हा प्रेमाचा

लावूया दिवा या हळुवार मनाचा  || ध्रु ||

 

स्निग्ध हृदयबिंदू तो ऊर्जेचा

निर्मळ भावनांच्या त्या वातीचा

उजळुद्या प्रकाश हा प्रेमाचा

लावूया दिवा या हळुवार मनाचा

 

भरावा अभाव रविकिरणांचा

नाही अवाका माझा ना तुमचा

चला लावूया सारे दिवा प्रेमाचा

उचलुया आपुला वाटा खारीचा

 

रात्रीनंतर क्रम आहे दिवसाचा

जाणतो मी हा नियम निसर्गाचा

प्रज्वलु द्या दिवा आता आशेचा

मिळून घेऊया ध्यास तो पहाटेचा

 

- गिरीश घाटे