नैराश्य
नको शब्द उसने, माझेच मांडतो आता
नको दुःख उसने, माझेच सांडतो आता
म्हणा गझल तिला, कोणी म्हणा हादसा
नसे गोष्ट उसनी, माझीच सांगतो आता
जगलो क्षण एकेक, घडोघडी सुखाचा
संपून ना संपे, दिवस लांबतो आता
उलटून रात्र जाई, खेळता, खेळ ताऱ्यांचा
रात्र तीच ही तरी, अंधार बोचतो आता
उठणे कधी निजणे, हसणे कधी रडणे
व्यर्थ असे हा खेळ, उगीच वाटते आता
- गिरीश घाटे