हातचे राखावयाचा, माझा स्वभाव नाही

आज या हकेला, कसे कोणीच नाही

उगिच कुजबुजीला, माझा आवाज नाही

 

सूर्यास झाली कशी, घाई लोपण्याची

लांब या सावलीचा, मला स्वीकार नाही

 

थांबले का वादळ, माझिया सोबतीचे

मधेच थांबण्याचा, माझा रिवाज नाही

 

विसाव्यास आता, रेंगाळली पाऊले

मोजक्या पावलांचा, माझा प्रवास नाही

 

मुठीतला आवेश, उगिच सैल झाला

हातचे राखावयाचा, माझा स्वभाव नाही

 

- गिरीश घाटे