चला होवुया पुन्हा अशिक्षित

चला होवुया पुन्हा अशिक्षित

सोडू गाठोडे संचिताचे,

महाज्ञानी मी जाणे वेद

टाकु बोल ते पंडितांचे

 

चला होवुया पुन्हा अशिक्षित

मारी आता उंच भरारी

सरले भय सरली ईर्षा

तारी मज माझा मुरारी

 

चला होवुया पुन्हा अशिक्षित

शोधू चालू नवीन वाटा

जुने जाऊद्या जुन्या दिशा

नवे तरंग नवीन लाटा

 

चला होवुया पुन्हा अशिक्षित

नेणु हेच जाणू , नेणु हेच जाणू

 

-              गिरीश घाटे