इरादा
डाव सोडावा अर्ध्यावर, नाही स्वभाव माझा
सोडावी अर्ध्यात साथ, नाही इरादा माझा
सांगा त्या तुफानाला, टक्कर ही खरी तुला
बहुदा नसावा ठाऊक, त्याला दरारा माझा
भले क्षणिक फांद्या, झुकल्या या वादळाला
रुतलेला खोल आहे, जीव मातीत माझा
नको शेफारु पाहून, अशांत नौकेस माझ्या
पाठीस ठाकला उभा, उत्तुंग किनारा माझा
- गिरीश घाटे