न मिळावे शिखर
न संपावी ही वाट, न मिळावे शिखर
मृगजळापरि पळावे, कधी न व्हावे सर
वाट ही फुलांची, वाट ही काट्यांची
चिरकाल रहावी, साथ ही सोबत्यांची
उत्तुंग खचित आहे, जागा त्या शिखराची
एकट्याची परंतु, ती एकट्या मनाची
- गिरीश घाटे
न मिळावे शिखर
न संपावी ही वाट, न मिळावे शिखर
मृगजळापरि पळावे, कधी न व्हावे सर
वाट ही फुलांची, वाट ही काट्यांची
चिरकाल रहावी, साथ ही सोबत्यांची
उत्तुंग खचित आहे, जागा त्या शिखराची
एकट्याची परंतु, ती एकट्या मनाची
- गिरीश घाटे