चारोळ्या -

दैव

मानले शिकवलेस तू, अनुभवातून मला

केले तयार मला तू,  या व्यवहारी जगाला

काय ही रीत दैवा, केली आधी परिक्षा

दिला मग विवेक तू, या नवख्या मनाला

 

नशा

सोम असो वा सुधा, असेल जे सुराईत तुझ्या

आज मी दिलजला, आलो महफिलीत तुझ्या

कलश असुदे अमृताचा, असुदे मद्याचा प्याला

लाजेल खचित पाहुनी, नशा नजरेतली तुझ्या

 

पूर्ण

पुर्ण असं काही नसतं, भ्रमाचं एक बिंब असतं

कधीच न गवसणारं, मृगजळाचं रूप असतं

आज काय मिळवलं, याला खरं महत्व असतं

कालच्या पेक्षा मोठं मन, हेच जमेचं माप असतं

 

- गिरीश घाटे