चारोळ्या -

सांग ना समजेल का ?

भावना मांडू कशा, शब्द हे अपुरे मला

गीत हे गाऊ कसे, सूर ना गवसे मला

रीत ही आड अशी, कशी बिलगू तुला

सांग ना समजेल का, ठाव या मनाचा तुला

 

कोठली ही बहादूरी

मानले लुटलेस तू, फिरुनी या दिलाला

केले गिरफदार तू, जायबंद, या दिलाला

सांगा कुणी तिला, कोठली ही बहादूरी

बंदिवान केलेस तू, फितूर या दिलाला

 

कोरडे चित्र

पाहतो चित्र तुझे, नजरेत एकटक माझ्या

दवात भिजलेली, चिंब ती कांती अन् काया

नव्हते दव ते कधी, आसवे डोळ्यात माझ्या

कोरडेच चित्र ते, शब्द कोरडे, कोरडी काया

 

- गिरीश घाटे