पांडुरंग भक्ती
अखेर आज एकदा, तू दिसलास पांडुरंगा
पहाटे गोड स्वप्नात, आज आलास पांडुरंगा
सावळा रंग तुझा, हात ठेऊनी कटीवर
पुंडलिकाच्या भेटीला, उभा होतास पांडुरंगा
तुळशी माळ गळा, कंठी शोभते कौस्तुभ
तुकयाला रिझवाया, सज्ज होतास पांडुरंगा
होते गोप सोबतीला, विठू तू लेकुरवाळा
जनाईच्या मदतीला, सिद्ध होतास पांडुरंगा
रूप पाहुदे डोळ्यांनी, आज स्वप्नात माझ्या
नको मोडु झोप आता, हेची मागणे पांडुरंगा
- गिरीश घाटे