मागणे
पहिले माझे पाऊल । वाचिली पुस्तके चार । केले स्वतःसी हुशार । शिक्षणाचा पाया || १ ||
दुसरे माझे पाऊल । मनासी केले खंबीर । केले निरोगी शरीर । सुदृढ ही काया || २ ||
तिसरे माझे पाऊल । केले अर्थार्जन जरूर । हा कुटुंबासी आधार । कर्तव्य कराया || ३ ||
आता पुढचे पाऊल । फेडू समाजाचे ऋण । दे विठ्ठला हाची गुण । आलो मगाया || ४ ||
- गिरीश घाटे