काळोखही खूप शिकवून जातो
कोण म्हणे मन उदास करतो
काळोखही खूप शिकवून जातो || ध्रु ||
सुख दुःखाचा हिशोब करुन
जमेची जाणीव करून देतो
जुनं झालं गेलं ते विसरून
नव किरणांची प्रतीक्षा देतो
दृष्टिक्षेपाला सीमित करून
वास्तवाची खरी पारख देतो
पळत्या सुखाचा माग सोडून
आहे त्या सुखाची जाण देतो
गोंगाट वाद विवाद संपवून
स्वतःशी बोलायची संधी देतो
भौतिकतेचा विसर पाडून
अंतर्मनाला साद घालू देतो
- गिरीश घाटे