धडपडलो मी सुख शोधाया

नको मला ते पाटी पुस्तक

रुबाब बाबांचा ऐट कराया

झटून कुढून त्रागा करून

धडपडलो मी सुख शोधाया

 

दायित्वाची जाण झुगारुन

यौवनात मी कैफ लुटाया

झटून कुढून त्रागा करून

धडपडलो मी सुख शोधाया

 

आहे नश्वर न स्वीकारून

शरीरव्याधी मात कराया

झटून कुढून त्रागा करून

धडपडलो मी सुख शोधाया

 

जर होते सुख बिंब मनाचे

मृगजळ लावी का धावाया

झटून कुढून त्रागा करून

का धडपडलो मी सुख शोधाया

 

-              गिरीश घाटे