चारोळ्या -

बहाणे

मानू कसे आभार, हवेच्या त्या झोताचे

फेडू कसे फिरुनी, ऋण त्यातल्या तृणाचे

मिळाले निमित्त हे, देण्यास तुला बहाणे

संतत वाहणाऱ्या, या नाठाळ आसवांचे

 

देहदान - एक द्विधा

असे स्तुत्य द्रव्यदान, परी श्रेष्ठ ज्ञानदान

सांगती पंडित करावे, मरणांती देहदान

गेला श्वास सोडूनी, नाहीच उरले माझे

उकला द्विधा मनाची, कसे करू देहदान

 

आज

होते हवे कळीला, त्वरेने फुलावे

होता क्रम फुलाचा, अखेरी गळावे

पसरे धुंद कळीचा, अन् गंध फुलाचा

मग व्यर्थ उगीका, कळीने झुरावे

 

किनारा

सोड त्या लाटेस आता,  शोधेल ती अपुला किनारा

सदा उत्कंठ झेलाण्या, ठाकला तो विस्तिर्ण किनारा

नको ही घेऊस शंका, केवढा तो तिचा आवाका

ठाम आहे तिच्याच ध्येया, गाठेल ती अपुला किनारा

 

- गिरीश घाटे